
शतावरी ही एक उत्तम औषधी वनस्पती असून ती काटेरी झुपकेदार वेल स्वरूपात असते. कडू-गोड चवीची, शीतवीर्याची असून मुळे व पाने औषध म्हणून वापरली जातात. आपल्या परसबागेत शतावरी लावणे खुपच फायदयाचे आहे. शतावरीचा उपयोग स्त्रीयांच्या लैगिंग इच्छाशक्तित वाढ होणे, बाळंतपणातील अशक्तपणा दूर करणेसाठी, दूधवृध्दीसाठी व प्रजोत्पादनासाठी होतो. शतावरी म्हणजे शत-आवरी म्हणजेच शंभर नर ताब्यात असलेली नार असा होतो. शतावरीच्या मुळया दूधात वाटून लावल्यास स्तन वृध्दीसाठी त्याचा उपयोग होतो.
शतावरीच्या कंदामध्ये सँपोनीन, ग्लायकोसाईडस, फॉस्फरस, रायबोफलेवीन, थायमीन, पोटँशियम, व इतरही रासायनिक द्रव्ये आहेत. शतावरीमध्ये व्हिटॅमिन –ए, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-बी-कॉम्पलेक्स जास्त प्रमाणात आढळतात. कँसर, क्षयरोग, कुष्ठरोग, आम्लपित्त, एडस इत्यादी आजारांवर उपचार करण्यासाठी शतावरी उपयोगात आणतात.
कॅन्सरच्या रूग्णांना तर शतावरी वरदानरूप ठरली आहे. त्याचेच हे उदाहरण एका व्यक्तिला तोंडाचा कॅंसर झाला होता. 5 मार्च 1971 रोजी तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की , याचा कॅन्सर शेवटच्या स्टेजला आहे. आता त्याचे ऑपरेशन करून देखील उपयोग होणार नाही. असे सांगून त्याला घरी पाठवून देण्यात आले. त्या कॅन्सर पिडीताला 5 एप्रिल 1971 रोजी असे कळले की शतावरीच्या सेवनाने कॅन्सर बरा होतो. त्याने शतावरीचे सेवन सुरू केले. त्याची स्थिती सुधारत गेली ऑगस्टमध्ये जेंव्हा एक्स-रे काढला तर कॅन्सर बरा झालेला आढळला. असा शतावरीचा महिमा आहे.
श्री. विकास शिंदे , अहमदनगर
